Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीड, परभणी प्रकरणाबाबत आरोपींना फाशीची मागणी करत वाशिममध्ये मोठा मूक मोर्चा

Protest
, रविवार, 12 जानेवारी 2025 (15:32 IST)
बीड सरपंच हत्या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराडची पोलिसातून सुटका झाली आहे. सरपंच खून प्रकरणात 7 आरोपींवर मोक्का लावण्यात आला असून कराड यांची सुटका करण्यात आली आहे. यावर कराड यांच्यावर मोक्का लावण्याची मागणी नागरिक करत आहे. 

बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांडात न्याय मिळावा या मागणीसाठी सर्वसामान्य जनता सातत्याने आंदोलन करत आहे. दरम्यान, वाशिममध्येही सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येत न्यायासाठी मूकमोर्चा काढला. बीड व परभणी प्रश्नासंदर्भात वाशिम येथे सर्वधर्मीयांच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.
 
या मूक मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू यांच्यासह अन्य राजकीय नेतेही उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
वाशिममध्ये या मोर्चात सर्व पक्ष, सर्व धार्मिक संस्था, सेवाभावी संस्था आणि संवेदनशील नागरिकांतर्फे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला हा विशाल मोर्चा पाटणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला.

यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. बीड हत्याकांडातील 7 आरोपींना अटक केल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र जोपर्यंत या घटनेचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही आणि कराडसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही न्यायाची मागणी करत राहणार आहोत.असे ते म्हणाले. 
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेसने नीट ऐकावे... संजय राऊतांचे कॉंग्रेसच्या नेत्यांना प्रत्युत्तर