Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 14 April 2025
webdunia

पक्ष्याला वाचवताना गमावला जीव

c link
मुंबई , गुरूवार, 2 जून 2022 (20:07 IST)
वांद्रे-वरळी सी-लिंक ओलांडताना पक्ष्याला वाचवायला जाणे हे एका व्यावसायिकाच्या जीवावर बेतले आहे. सोमवारी दुपारी अमर जरीवाला आणि त्यांच्या चालकाला काळ्या-पिवळ्या टॅक्सीने धडक दिली. यात व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, टक्कर इतकी जोरदार होती की जरीवाला हवेत उडून रेलिंगवर आणि नंतर कारच्या वाटेवर पडले. दोघांनाही जवळच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी जरीवाला यांना मृत घोषित केले. त्यांचा चालक शाम कामत (41) याच्यावर उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
 
अपघातानंतर पोलिसांनी टॅक्सी चालक रवींद्र कुमार जैस्वार (38) याला अटक केली असून, बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वरातीचा घोडा संतापला अन् नवरदेवाचा पायच मोडला