Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार
, शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (08:35 IST)
येत्या ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी माहिती दिली आहे. कोरोनाचं सावट अद्यापही असल्याने लोकल सेवा सुरू करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला. 
 
कोरोनाची दुसरी लाट येवू नये म्हणून नागरिकांनी प्रत्येक गोष्टीची खबरदारी बाळगली पाहिजे. यंदाच्या वर्षांतील नाताळ साधा नाही. दिवाळी, दसरा, गणपती या सणांवर देखील कोरोना व्हायरसचं सावट होतं. त्यामुळे नव्या वर्षातच लोकलबाबत विचार करू असं वक्तव्य आयुक्त इकबाल चहल यांनी केलं. 
 
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येवू नये म्हणून खबरदारी बाळगली जात आहे. मुंबई महापालिकेकडून चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. शिवाय परराज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या देखील करण्यात येत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार