बदलापूर दोन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बुधवार 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. एक दिवसीय या बंद मध्ये तिन्ही पक्ष सहभागी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात माध्यमांना ही माहिती दिली.
मुंबईत आज माविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि नसीम खान यांची उपस्थिती होती. या बाबत संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला आणि म्हणाले, येत्या 24 तारखेला आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा.आज बदलापूर प्रकरणात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांसह राज्य सरकारचा निषेध केला.
राज्यातील ठाणे जिल्ह्यात बदलापुरात एका शाळेच्या स्वछतागृहात दोन चिमुकलींवर एका कर्मचाऱ्याने बलात्कार केला. या घटनेनंतर हजारो संतप्त आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकचे रेल्वे ट्रॅक अडकवून रेल रोको केले.संतप्त पालक आणि नागरिकांनी शाळेच्या इमारतीत जाऊन तोडफोड केली.पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.पोलिसांना आंदोलकांना रेल्वे रुळावरून पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले की,बदलापूर लैंगिक शोषणाप्रकरणी निर्दशने राजकीय हेतूने प्रेरित होती.राज्य सरकारची बदनामी करण्याच्या हा त्यांचा उद्धेश्य आहे. बहुतांश आंदोलक बाहेरचे होते.या घटनेवर राजकारण करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
Edited by - Priya Dixit