Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत 20 मजली इमारतीला भीषण आग ; 7 ठार अनेक जखमी

मुंबईत 20 मजली इमारतीला भीषण आग ; 7 ठार अनेक जखमी
, शनिवार, 22 जानेवारी 2022 (12:32 IST)
मुंबईतील ताडदेव परिसरातील भाटिया हॉस्पिटलजवळील 20 मजली इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, 6 वृद्धांना ऑक्सिजन सपोर्ट सिस्टमची गरज असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अडकलेल्या सर्वांची सुटका करण्यात आली आहे. आग आटोक्यात आणली असली तरी धुराचे लोट खूप जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
 
अग्निशमन विभागाच्या अधिकारींच्या म्हणण्यानुसार, आग सकाळी 7.28 वाजता लागली आणि 8.10 वाजता स्तर 3 म्हणून घोषित करण्यात आले. आग विझवण्यासाठी 13 अग्निशमन दल आणि सात जंबो टँकर सेवेत लावण्यात आल्याचे विभागाने सांगितले. आगीच्या ज्वाळा एवढ्या भीषण होत्या की त्या आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना खूप प्रयत्न करावे लागले.

15 जणांना भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 3 आयसीयूमध्ये तर 12 जण जनरल वॉर्डमध्ये दाखल आहेत. तर चार जखमींना नायर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, त्यापैकी दोघांना मृत आणण्यात आले आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर 10 वाक्ये