Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

पालघरमध्ये अडीच कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त, आरोपीला अटक

arrest
, रविवार, 9 फेब्रुवारी 2025 (15:17 IST)
पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे अडीच कोटी रुपयांच्या क़ीमतीचे बंदी घातलेले अमली पदार्थ मेफेड्रोन जप्त केले आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. हे अमली पदार्थ स्वता:च्या घरात हे औषध त्यार करत होता. 
पालघरच्या बोइसर भागात एका घरात बेकायदेशीर अमली पदार्थ तयार केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारावर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा विशेष पोलिस पथकांकडून छापा टाकण्यात आला.मेफेड्रोन व्यतिरिक्त पोलिसांच्या पथकाने अमली पदार्थ बनवण्याचे उपकरण देखील जप्त केले आहे. 
या प्रकरणी एकाला अटक केली असून आरोपी रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर आहे. आरोपीने घराचे रूपांतरण ड्रग्स लॅबमध्ये केले होते. या घरात आरोपी बेकायदेशीरपणे मेफेड्रोन बनवत होता.
आरोपीच्या विरुद्ध एनडीपीएस नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून आणत होता आणि हे अमली पदार्थ कोणाला आणि कुठे पाठवत होता याचा शोध पोलिस घेत आहे.  
Edited By - Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: सुप्रिया सुळे यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी दिले प्रत्युत्तर