Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 12 April 2025
webdunia

बदलापूरमध्ये अल्पवयीन कर्करोग पीडितेवर बलात्कार, आरोपी तरुणाला अटक

arrest
, रविवार, 6 एप्रिल 2025 (14:12 IST)
बदलापूर पोलिसांनी 2 मार्च रोजी बदलापूरमध्ये कर्करोगाने ग्रस्त असलेल्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 29 वर्षीय पुरूषाला अटक केली आहे. आरोपीचे नाव सूरज सिंग असे आहे, जो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. पीडितेवर मुंबईतील एका रुग्णालयात केमोथेरपी सुरू होती.
पीडितेच्या वडिलांचे निधन झाले असून मुलीची आई मुलीला मेंदूच्या कर्करोगाच्या उपचारासाठी मुंबईला घेऊन आली. पीडित मुलीची आई आणि आरोपी बिहारमधील एकाच गावाचे असल्याने एकमेकांना ओळखत होते. आरोपीने पीडित मुली आणि तिच्या आईच्या राहण्यासाठी बदलापुरात भाड्याने खोली बघून दिली.
 ALSO READ: ठाणे शहरात नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, नाशिकमधून आरोपीला अटक
आरोपीने घरी कोणी नसता पीडितेच्या घरात प्रवेश केला आणि बेडरूम मध्ये पीडिता झोपलेली पाहून तिच्यावर अतिप्रसंग केला. आरोपी वारंवार पीडितेवर अति प्रसंग करायचा. गेल्या दीड महिन्यांपासून हे सर्व सुरु होते. या मुळे पीडित मुलगी गर्भवती झाली. 
तिची केमोथरेपी झाल्यावर अहवाल तपासल्यावर ती गरोदर असल्याचे उघडकीस आले. डॉक्टरांनी पोलिसांना कळवले नंतर आरोपीच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. 
एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.  
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लातूर मनपा आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न