मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या मनसेच्या काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत यांचा समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली असून 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या नेत्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी मनसेच्या चारही नेत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत यांना 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे. हे सर्व नेते पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, विना तिकीट प्रवास तसंच रेल्वे अधिनियम कलम 147, 153, 156 अन्वये कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.