सध्या पंतप्रधान नरेंद्रमोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. पंतप्रधान मोदी हे वाशिमच्या पोहरादेवी येथील जगदंबा देवीच्या मंदिरात पोहोचले आणि त्यांनी देवीची पूजा केली. या वेळी त्यांनी मंदिरातील पारंपरिक ढोल वाजवला. पंतप्रधान मोदींनी नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.या वेळी त्यांनी पारंपरिक ढोल वाजवले
हे मंदीर बंजारा समाजातील असून त्यांची आई जंगदंबा पोहरादेवीवर श्रद्धा आहे. आरती करताना आणि देवीची विशेष पूजा करताना ढोल वाजवण्याचे विशेष महत्व आहे. ढोल वाजवून मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. लोक आपल्या मनातील इच्छा किंवा नवस पूर्ण झाल्यावर देवीच्या मंदिरातील ढोल वाजवून आनंद व्यक्त करतात.नंतर पंतप्रधांनानी बंजारा हेरिटेज म्यूजियमचे उदघाटन केले.