Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खासदार नवनीत राणांची तब्येत खालावली

navneet rana
, सोमवार, 25 एप्रिल 2022 (08:26 IST)
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना भायखळा, तर रवी राणा तळोजा जेलमध्ये रवानगी करण्यात आली. यावेळी नवनीत राणांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे.
 
मुंबई पोलिसांनी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांना न्यायालयात हजर केले. या दोघांवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 124 अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर नुकतीचं त्यांची सांताक्रुझ पोलिस ठाण्यातून नवनीत राणा यांना भायखळा, तर रवी राणा तळोजा जेलमध्ये रवानगी करण्यात आली.
 
यानंतर आता खासदार नवनीत रवि राणा यांची तब्येत खालावली बातमी समोर आली आहे. मेडिकल चेकअपमध्ये त्यांचे ब्लड प्रेशर वाढल्याचे दिसून आले, अशी माहिती आहे. नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये रवानगी झाली आहे तर रवी राणा तळोजा जेल रवानगी करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमदनगरच्या दौऱ्यावर आलेले आमदार अडकले हॉटेलच्या बाथरुममध्ये !