पश्चिमी मुंबईच्या गोरेगांव मध्ये 57 वर्षीय एका सेल्समन ने आपल्या फिजियोथेरेपिस्ट पत्नीची हत्या केली आहे. व नंतर स्वतः बिल्डिंगवरून उडी घेत आत्महत्या केली आहे.
पश्चिमी मुंबईच्या गोरेगांव मध्ये 57 वर्षीय एका सेल्समन ने आपल्या फिजियोथेरेपिस्ट पत्नीची हत्या केली आहे. व नंतर स्वतः बिल्डिंगवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जवाहर नगर परिसरामध्ये पहाटे घडली आहे.
या सेल्समनचे शव बिल्डिंगच्या खाली मिळाले त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत्यूची सूचना देण्यासाठी त्यांच्या पत्नीला फोन करण्यात आला पण उत्तर मिळाले नाही. म्हणून पोलिसांनी तपास केला तर फ्लॅटचे दार बंद होते. पोलिसांनी दार उघडून आत पहिले तर सेल्समनची पत्नी हॉल मध्ये पडलेल्या अवस्थेत आढळल्या.
तसेच पोलिसांनी माहिती दिली की, या जोडप्याचा मुलगा दिल्लीमध्ये राहतो. त्याला या घटनेबद्दल माहिती देण्यात आली आहे. अद्याप हत्या आणि आत्महत्याचे कारण स्पष्ट झालेले नाही, गोरेगांव पोलिसांनी केस नोंदवून घेत चौकशी सुरु केली आहे.