Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 28 February 2025
webdunia

मुंबईतील उद्योजक आणि शस्त्र विक्रेता अभिषेक वर्मा एकनाथ शिंदे गटात सामील

मुंबईतील उद्योजक आणि शस्त्र विक्रेता अभिषेक वर्मा एकनाथ शिंदे गटात सामील
, शुक्रवार, 31 जानेवारी 2025 (10:55 IST)
Photo courtesy X
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उद्योजक देखील शामिल होत असून  मुंबईतील उद्योजक आणि शस्त्र विक्रेता अभिषेक वर्मा हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शामिल झाले आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक वर्मा यांच्याकडे शिवसेना पक्षाचे समन्वयकपद देण्यात आले आहे. याआधी त्यांच्यावर हेलिकॉप्टर घोटाळा, पाणबुडी खरेदी घोटाळा प्रकरणात लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मात्र, 2015 आणि 2017 मध्ये न्यायालयाने अभिषेक वर्मालाही या सर्व आरोपातून दोषमुक्त केले होते.
सीबीआयच्या पथकाने अभिषेक वर्माविरुद्ध या प्रकरणांचा तपास केला होता. यापैकी एका प्रकरणात त्यांची पत्नी अंका वर्माही आरोपी असल्याचे सिद्ध झाले होते, परंतु त्यांचीही सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. अभिषेक वर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगाही उपस्थित होते.
 
याबाबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या X पोस्टवर लिहिले, “सुप्रसिद्ध उद्योगपती अभिषेक वर्मा यांनी आज जाहीरपणे शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक, गुइलेन बॅरे सिंड्रोमने आणखी एक मृत्यू 16 नवीन रुग्ण आढळले