Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई : DRI ची मोठी कारवाई, 7.9 करोडचे लाल चंदन जप्त

Red sandalwood
, शनिवार, 6 जुलै 2024 (12:41 IST)
महाराष्ट्रातील मुंबई मध्ये DRI ने 7.9 करोड रुपये किमतीचे 8 मीट्रिक टन लाल चंदन जप्त केले आहे. हे चंदन ग्रॅनाईट मार्बल स्लॅब प्रमाणे निर्यात केले जात होते. शुक्रवारी अधिकारींनी ही माहिती दिली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई मधील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये चेकिंग करण्यासठी एक कंटेनर थांबवण्यात आला. यानंतर डीआरआयची मुंबई जोनल युनिटने एक्सपोर्टर, कमिशन ब्रोकर, गोडाऊन प्रबंधक, ट्रांसपोर्टर सोबत इतर पाच लोकांना ताब्यात घेतले आहे. 
 
कंटेनरमध्ये पॉलिश केल्या गेलेल्या ग्रॅनाईट स्लॅब आणि सिमेंट विटांच्या खाली सहा टन लाल चंदन लपविण्यात आले होते. तसेच तेलंगणा, अहमदनगर, नाशिक, हैद्राबाद मध्ये देखील धाड टाकण्यात आली आहे. यादरम्यान नाशिक मधून दोन टन लाल चंदन जप्त करण्यात आले आहे. चंदनाची ही तस्करी येत्या काही दिवसांमध्ये एक्स्पोर्ट केली जाणार होती. तसेच ओपींना अटक करून त्यांची चौकशी सुरु आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खेकडे पकडतांना डोंगरावर रस्ता भटकले पाच मुलं, सात तासांत केले रेस्क्यू