Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mumbai Building Collapsed :बोरिवलीत 4 मजली इमारत कोसळली;बचावकार्य सुरु

Mumbai Building Collapsed :बोरिवलीत 4 मजली इमारत कोसळली;बचावकार्य सुरु
, शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (13:36 IST)
मुंबई-बोरोवलीत 4 मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. बोरिवलीत साईबाबा नगरच्या गीतांजली इमारतीत ही दुर्घटना घडली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे. घटनेची माहित मिळतातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु आहे. गीतांजली ही  तळ मजला आणि वर तीन मजली इमारत असून दुपारी 12:34 वाजेच्या सुमारास कोसळली.
या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे. 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dahi Handi 2022 :दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज 9 थरांचा रिकॉर्ड तुटणार का ?