Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत अवैध शस्त्रांसह पाच जणांना अटक

मुंबईत अवैध शस्त्रांसह पाच जणांना अटक
एका मोठ्या कारवाईत, मुंबई गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली आहे. हे सर्वजण परवान्याशिवाय अवैध शस्त्रे आणि दारुगोळा विकण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस आता आरोपींची चौकशी करत आहे. ही घटना पायधोनी परिसरात घडली, जिथे एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून या लोकांना रंगेहाथ पकडले.
 
मिळालेल्या माहितीनुसार नारायण धुरू रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये काही लोक अवैध शस्त्रांचा व्यवहार करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर, मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तात्काळ एक पथक तयार करून पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर घटनास्थळी छापा टाकला.
 
छाप्यादरम्यान, पोलिसांनी तेथे उपस्थित असलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून तीन पिस्तूल, तीन मॅगझिन आणि २१ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यांच्या शस्त्र परवान्यांबद्दल विचारले असता, ते कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकले नाहीत. चौकशीदरम्यान, त्यांनी शस्त्रे विकण्यासाठी आणल्याचे कबूल केले.  
पायधोनी पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. इतर संबंधित कलमेही लावण्यात आली आहे. या आरोपींचे कोणत्याही मोठ्या टोळ्यांशी संबंध आहेत का, याचाही पोलीस तपास करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात २१ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप