Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 16 April 2025
webdunia

मुंबई क्राईम ब्रँची मोठी कारवाई, काश्मीरमधून ड्रग्ज तस्कराला अटक

Mumbai Crime Branch
, शनिवार, 15 जानेवारी 2022 (15:34 IST)
मुंबई क्राईम ब्रँचने  काश्मीरमधून गुलजार मकबूल अहमद खान नावाच्या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. त्यामुळे ड्रग्ज तस्करप्रकरणी आणखी माहिती मिळण्याची शक्यता असून ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
 
काही महिन्यांपूर्वी मुंबई क्राईम ब्रँचने 24 किलो ड्रग्जसह 4 जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात गुलजार मकबूल अहमद खान  याचे नाव समोर आले होते. त्यानंतर मुंबई पोलीस अनेक दिवसांपासून त्याला पकडण्याचे नियोजन करत होते. यासाठी मुंबई क्राइम ब्रँचचे 7 जणांचे पथक काश्मीरला गेले आणि गुलजार मकबूल अहमद खान याच्या मुसक्या आवळल्या.
 
काश्मीरमधील सुमारे 100 काश्मिरी पोलिसांनी मुंबई पोलिसांना बॅकअप दिला. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रँचने आरोपीला श्रीनगरमधील शेरगारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगरमल बाग परिसरातून अटक केली. गुलजार मकबूल अहमद खान हा कोणत्यातरी दहशतवादी संघटनेचा स्लीपर सेल असू शकतो आणि ते नार्को टेररिझमचे प्रकरण असू शकते, असा पोलिसांना संशय आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनोहर पर्रीकर यांच्या मुलाची बंडखोरीची तयारी