Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

४ ऑगस्टला लसीकरण बंद ठेवण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय

४ ऑगस्टला लसीकरण बंद ठेवण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय
, बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:33 IST)
मुंबईतील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा असल्याने ४ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने १६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहीम राबवायला सुरुवात केली. मात्र केंद्र सरकार आणि लस उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून मुंबईतील शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर आवश्यक लसीचा पुरवठा होत नसल्याने मुंबई महापालिकेला अधूनमधून लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे.
 
कोविड – १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर ४ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असे मुंबई महापालिका प्रशासनाने कळवले आहे.
 
दरम्यान आज मुंबईत गेल्या २४ तासांत २८८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३५ हजार ६५९वर पोहोचले आहेत.यापैकी आतापर्यंत १५ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख १२ हजार ७२३ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या मुंबईत ४ हजार ६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अतिक्रमण विभागाची मेगा वसुली.. मनपाच्या तिजोरीत आले अडीच कोटी