राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत तर येत्या 3 मे पर्यंत मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी दंगलीचा सामना करण्यासाठी तयारी केली.
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीसही सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांनी अॅक्शन प्लान तयार केला आहे.
काय आहे अॅक्शन प्लॅन
मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमध्ये 1504 पॉइंट
प्रत्येक पोलीस ठाण्यात ४ बीट चौकी, प्रत्येक बीटमध्ये ४ पॉइंट्स
24 तास पेट्रोलिंग केली जाणार....
एसआरपीएफच्या 57 प्लाटून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
1 प्लाटून मध्ये 25 अधिक 1 म्हणजे 26 पोलिस असतील.
मुंबई पोलिसांकडे कोणत्याही वेळी 33 प्लाटून सज्ज असतात.
15 प्लाटून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पथक सज्ज
दंगा नियंत्रण पोलिसांच्या 6 प्लाटून सज्ज