Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात मतदार यादीवरून गोंधळ; आज मुंबईत विरोधी पक्षांचा सत्य मोर्चा, मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

mumbai police
, शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 (10:33 IST)
आज मुंबईत विरोधी पक्षांचा सत्य मोर्चा, पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाच्या कथित अनियमिततेविरोधात महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत सत्य मोर्चाचे आवाहन केले आहे. पण आता पोलिसांनी परवानगी नाकारली.
सत्य मोर्चा मध्ये शिवसेना युबीटी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि इतर अनेक पक्षांचा समावेश आहे. हा मोर्चा आज दुपारी १ वाजता मेट्रो सिनेमापासून सुरू होणार होता आणि महानगरपालिका रोड मार्गे आझाद मैदानापर्यंत जाणार होता. 
 
मोर्चाला परवानगी नाकारली
तथापि, कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी देण्यास नकार दिला आहे. परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. असे असूनही, विरोधी पक्षांनी स्पष्ट केले आहे की ते निषेध करण्याचा त्यांचा लोकशाही अधिकार वापरतील.
तसेच पोलिसांनी सुरक्षेसाठी ३५० कर्मचारी, ७० अधिकारी आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) चार पलटण तैनात केले आहे. याव्यतिरिक्त, वाहतूक विभागाने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहे.
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: आज मुंबईत विरोधी पक्षांचा भव्य "सत्य मोर्चा" होणार