मुंबई: मुंबई पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करून सायन भागातून तब्बल 21 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. ही ड्रग्स राजस्थान, प्रतापगड भागातून देशभरात पुरवतात. ही मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी कारवाई करण्यासाठी सापळा रचला आणि घाट कोपर दलाच्या पथकाने अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत एकाला अटक केली. हा आरोपी ड्रग्स पुरवणारा असल्याचे सांगितले जात आहे. याच्या जवळ ड्रग्सचा मोठा साठा जप्त केला आहे या मध्ये कोकेन, हेरोईन, चरस, गांजा, एमडी, एलसीडी डॉट्स, कफ सिरप, नशेच्या गोळ्या असा मोठा साठा आहे.