Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई होणार निर्बंधमुक्त ! महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांचे संकेत

मुंबई होणार निर्बंधमुक्त ! महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांचे संकेत
, मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (13:33 IST)
मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमिक्रोन व्हायरसने धुमाकुळ घातला होता. त्यामुळे पुन्हा निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील कोरोनाचे निर्बंध काही शिथिल करण्यात येणार आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी सापडत असल्याने कोविडचे निर्बंध कमी करण्यात येत असताना आता मुंबई पूर्णपणे निर्बंधमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे कळते आहे. फेब्रुवारीनंतर मुंबई 100 टक्के निर्बंधमुक्त होणार आहे. 
 
मुंबई महापालिका अनलॉकची शिफारस टास्क फोर्सला करणार आहेत. याबाबतचे संकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यानी दिले आहेत. . त्यामुळे मुंबई निर्बंधमुक्त होणार आहे. 
 
रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने घसरत असून पुढील दोन आठवडे रुग्ण संख्या अशीच घसरत राहिली तर फेब्रुवारीनंतर मुंबई 100 टक्के निर्बंधमुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
 
दोन आठवडे रुग्णसंख्येचा आढावा घेत मुंबई अनलॉक करण्याची शिफारस पालिका टास्क फोर्सला करणार आहे. त्यानंतर मुंबईला अनलॉक करण्याची शिफारस टास्क फोर्सकडे करण्यात येणार आहे. 
 
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता चित्रपटगृह आणि नाट्यगृह 100 टक्के खुली करण्याची मागणी केली जात आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 100 टक्के उघडी करावी अशी मागणी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्रकारांसाठी PIB चा मोठा निर्णय