महापालिका ह्युमन सोसायटी इंटर नॅशनल संस्थेच्या माध्यमातून तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची गणना करणार आहे. मात्र ही गणना पूर्ण होऊन अहवाल सादर होण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे समजते.
मुंबई महापालिका कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी खासगी संस्थांमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करते. मात्र निर्बीजीकरण प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. सदर खासगी संस्थांनी, सन २०१८ मध्ये ८५,४३८ कुत्र्यांचे , सन २०१९ मध्ये ७४,२७९ कुत्र्यांचे , २०२० मध्ये ५३,०१५ कुत्र्यांचे, २०२१ मध्ये ६१, ३३२ कुत्र्यांचे आणि ऑगस्ट २०२२ पर्यंत ५०, ६२२ कुत्र्यांचे असे मागील पाच वर्षात एकूण ३,२४,६८६ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.
मागील पाच वर्षांत कुत्रे चावल्याची माहिती –
वर्ष संख्या –
२०१८ – ८५,४३८
२०१९ – ७४,२७९
२०२० – ५३,०१५
२०२१ – ६१, ३३२
२०२२ – ५०, ६२२
Edited by : Ratnadeep Ranshoor