Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

मुंबई ‘बिर्याणी किंग’ यांचे ‘कोरोना’मुळे निधन

मुंबई ‘बिर्याणी किंग’ यांचे ‘कोरोना’मुळे  निधन
, शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (16:35 IST)
तब्बल सहा दशके खवय्यांना लज्जतदार बिर्याणीची मेजवानी देणारे मुंबईतील ‘बिर्याणी किंग’ व ‘दिल्ली दरबार’ रेस्टॉरंटचे मालक जफरभाई मन्सुरी (83) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 
 
सात दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली.  मरिन लाईन्स येथील स्मशानभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या मागे चार मुले आणि तीन मुली असा परिवार आहे.
 
जफरभाईंनी दिल्ली दरबार या रेस्टॉरंटच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर जफरभाई दिल्ली दरबार या नावानं स्वत:ची खास ओळख निर्माण केली होती. मरिन लाईन्स, माहीम, ग्रँट रोड, जोगेश्वरी, वाशी, डोंगरी, मोहम्मद अली रोड येथे जाफरभाईंनी दिल्ली दरबारच्या शाखा सुरु केल्या. या रेस्टॉरंटच्या माध्यमातून त्यांनी मुंबईला मोगलाई पदार्थांची आवड असलेल्या खवय्यांचं केंद्र बनवलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस बरसणार, यलो अलर्ट जारी