Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एनआयएकडे

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एनआयएकडे
, शनिवार, 20 मार्च 2021 (16:31 IST)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवलेला आहे. त्यानंतर आता अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासही केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे दिला होता. मात्र, आता हे प्रकरणही एनआयएकडे देण्यात आलं असून, यासंदर्भातील आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने काढले आहेत. 
 
अंबानी यांच्या घराजवळ एक जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आली होती. ही घटना समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आला होता. मात्र, केंद्राने एनआयएकडे तपास सोपवला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अंबानी स्फोटकं प्रकरणातील महत्त्वाची व्यक्ती असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळून आला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मयत इसमाचा व मनसुख हिरेन प्रकरणाचा कोणताही संबंध नाही