Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत रुग्णांसाठी जागा नाही, सर्व रुग्णालयं फुल्ल

मुंबईत रुग्णांसाठी जागा नाही, सर्व रुग्णालयं फुल्ल
, शुक्रवार, 5 जून 2020 (17:58 IST)
देशात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वात जास्त रुग्णांची संख्या सध्या महाराष्ट्रात असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 75 हजारहून अधिक झाली आहे. एकट्या मुंबईत आतापर्यंत 44 हजार 704 कोरोना रुग्ण आहेत.
 
कोरोनाबाधितांचा सतत वाढत असलेल्या आकड्यामुळे येथील सर्व रुग्णालयं पूर्णपणे भरली आहे. त्यामुळे आता नवीन रुग्णांसाठी जागेची समस्या उद्भवताना दिसत आहे. 
 
मुंबईतील रुग्णालयात 9092 बेडची व्यवस्था असून यापैकी 94 टक्के म्हणजेच 8570 बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत. सध्या मुंबईत 1097 ICU बेड असून त्यातील 98 टक्के ICU बेड व्यापलेले आहेत. 
 
कोव्हिड केअरमध्ये 7107 बेडची व्यवस्था करण्यात आली असून 61 टक्के बेड भरलेले आहेत. मुंबईतील रुग्णालयात 85 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 74 टक्के ऑक्सिझन बेड भरले आहेत.
 
मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 हजार 704 झाली असून मृतांची संख्या 1465 वर पोहचली आहे. सध्या 25 हजार 141 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या आर्थिक वर्षात नवीन योजना सुरू करु नका