Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

रुग्णालयातल्या लव्ह सिनवर आमचं..."; पेडणेकरांनी सांगितलं लीलावतीत जाण्याचं कारण

kishori pednekar
मुंबई , बुधवार, 11 मे 2022 (21:55 IST)
नवनीत राणांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला होता.
 
नवणीत राणा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. रुग्णालयातून बाहेर आलेल्या नवनीत राणांना लीलावती रुग्णालयात  दाखल करण्यात आलं होतं. त्याठिकाणी झालेल्या फोटो सेशनवरुन शिवसेनेने त्यांच्यावर निशाणा साधला होता. तसंच शिवसेनेच्या मनिषा कायंदे आणि किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी थेट रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला होता. त्यावर आज नवनीत राणांनी टीका केली. माझ्या ट्रीटमेंटबद्दल प्रश्न विचारण्याचा हक्क त्यांना कुणी दिला असा सवाल राणांनी उपस्थित केला.
 
कम्पाऊंडरने डॉक्टरला प्रश्न विचारले; नवनीत राणांचा पेडणेकरांना टोला
नवणीत राणांची पत्रकार परिषद संपल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी 'लोकशाही'सोबत संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राणा दाम्पत्यांनी 14 दिवसांच्या भेटीनंतर रुग्णालयात जो लव्ह सिन केला, त्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही, रुम आणि पार्किंगमध्ये त्यांनी फोटो काढावे त्याबद्दल आमचा आक्षेप नाही मात्र एम. आर. आय करताना जे फोटो काढले त्यावरुन आम्ही रुग्णालयाला जाब विचारला. एम. आर. आय मशिनजवळ फोन सारख्या वस्तु घेऊन जाणं चालत नाही, मागे नायर रुग्णालयातच एका मुचाला त्यामुळे मृत्यू झाला. राणांच्या प्रसिद्धीसाठी तिथे लोकांचा जीव धोक्यात होता, त्यामुळे आम्ही सवाल उपस्थित केल्याचं पेडणेकरांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राम जन्मभूमी प्रकरणात आम्ही वकील होतो, लवकरच अयोध्येला जाणार"