Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओबीसी जनगणनेची पंकजा यांची मागणी

ओबीसी जनगणनेची पंकजा यांची मागणी
मुंबई , सोमवार, 25 जानेवारी 2021 (15:23 IST)
स्व. गोपिनाथ मुंडे यांची अपूर्ण लढाई मी लढणार आहे. ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे. कोणत्याही पदावर नसताना ही चळवळ मला लढायची आहे, अशी भूमिका भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. 
 
“ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवळी मांडली. प्रीतम मुंडे यांनीदेखील संसदेत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊलं सकारात्मक पडली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येत गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
 
कोणतीही प्रतिक्रिया नाही हीच माझी प्रतिक्रिया आहे. हा विषय अतिशय संवेदनशील आहे. मी या कोणत्याही विषाचे राजकारण केले नाही. करणार नाही. हेच माझे संस्कार आहेत. अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे आरोप प्रकरणावर दिलेली आहे.
 
आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमचीही गणना करा. ओबीसी जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता आहे. कुछ यादे और कुछ वादे, असे टि्वटमध्ये मुंडे यांनी म्हटले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकरी आंदोलन: 'काँग्रेस-राष्ट्रवादीचा ढोंगीपणा कशासाठी?' देवेंद्र फडणवीस यांचा सवाल