Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध
, बुधवार, 28 एप्रिल 2021 (10:55 IST)
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) द्वारे विमानांच्या  लँडींग, टेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दि. 19 जून 2021 पर्यंत हे आदेश लागू राहतील.
 
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेसर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडींग), विमानाच्या उड्डाणात (फ्लाईट), उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडचण आणण्याची घटना लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. विमान उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 
मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई, एस.चैतन्य यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाबाधित आरोपी दीप्ती काळेची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या