मुंबई पोलिसांविरोधात ठरवून मोहिम चालवली गेल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलंय. आमची चौकशी ही प्रोफेशनल होती. AIIMS नेदेखील आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला दिला. यामध्ये आम्हाला कोणतही आश्चर्य वाटलं नसल्याचे ते म्हणाले.
अभिनेता सुशांत सिह राजपूतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा आणि सीबीआयकडे द्यावा ही मागणी मान्य करण्यात आली. पण एम्सच्या अहवालानंतर त्याच्या शरीरात विषाचा अंश किंवा घातपात झाल्याचा निष्कर्ष निघाला नाही.
मुंबई पोलिसांविरोधात एक मोहीम चालवली गेली. मात्र सत्य अखेर समोर आलं. सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवून एक मोहीम चालवली गेली त्याबाबत चौकशी सुरू असून कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.