Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परमबीर सिंग ४८ तासांत सीबीआयसमोर हजर होणार; आश्वासन

परमबीर सिंग ४८ तासांत सीबीआयसमोर हजर होणार; आश्वासन
, सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (16:04 IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेल्या ९ महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देण्याची याचिका त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. सिंग नेमके कुठे आहेत, असा सवाल न्यायमूर्तींनी गेल्या आठवड्यात सुनावणी दरम्यान उपस्थित केला. त्याला सिंग यांच्या वकिलांनी आज उत्तर दिलं. सुप्रीम कोर्टाकडून परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंग यांना ६ डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत.
परमबीर सिंग भारतातच आहेत. ते देश सोडून गेलेले नाहीत. सुप्रीम कोर्टानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते पुढील ४८ तासांत सीबीआयच्या कार्यालयात अथवा कोर्टात हजर होतील, असं सिंग यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्यांना अटकेपासून दिलासा दिला. परमबीर यांनी तपासाला सहकार्य करावं, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले.
परमबीर सिंग यांच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी पुनीत बाली यांनी केली आहे. सीबीआयकडे या प्रकरणांचा तपास गेला तर ते कोणत्याही क्षणी समोर येतील, असं सिंग यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव सरकारचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचा मुलगाही मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी होता, असा दावा ईडीने कोर्टात केला आहे.