एनसीपी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल दसऱ्याच्या दिवशी अज्ञात हल्लेखोऱ्यानी गोळी झाडून हाय केली. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,हणाले, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. या गोळीबार प्रकरणात आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये अशी सूचना मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर काल संध्याकाळी त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर निर्मल नगर, वांद्रे पूर्व, मुंबईतील कोलगेट मैदानाजवळ अज्ञात हल्लेखोऱ्यानी गोळ्या झाडल्या त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणावर राहुल गांधी आणि ओविसी सह इतर नेत्यांनी सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहे. या गोळीबारामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणात राज्य सरकार ने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि निष्पक्ष निर्णय द्यावा अशी मागणी केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या प्रकरणात निष्पक्ष न्याय मिळण्याची मागणी केली असून राज्य सरकार ने या प्रकरणात पारदर्शक तपासाचे आदेश देण्याची मागणी केली आहे.