दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून रेल्वेला पत्र पाठविण्यात आले होते. तसे परिपत्रक काढले होते. मात्र, रेल्वेकडून खोडा घालण्यात आला होता. भाजपने या वादात उडी घेत राज्य सरकारवरच टीका केली. दरम्यान, आम्ही सकारात्मक असल्याचे मध्य रेल्वे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. रेल्वेकडून कुठलाही विलंब नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तर दुसरीकडे राज्य सरकार म्हणतेय रेल्वेकडूनच ग्रीन सिग्नल मिळत नाही. महिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याबाबत रेल्वेला पुन्हा पत्र पाठवले आहे. रेल्वे तसेच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेची आठवणही या पत्राद्वारे मुख्य सचिवांनी करून दिली आहे.मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 20, 2020