Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हेल्पलाईनवर तक्रारीवर पाऊस, नागरीकांनी पालिकेकडे तात्काळ मदतीसाठी दाद मागितली

हेल्पलाईनवर तक्रारीवर पाऊस, नागरीकांनी पालिकेकडे तात्काळ मदतीसाठी दाद मागितली
, मंगळवार, 18 मे 2021 (12:51 IST)
मुंबईमध्ये तौत्के चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला. त्यामुळे मुंबईकरांनी महापालिकेच्या विविध नागरी सेवासुविधांबाबतच्या ‘१९१६’ या हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क करून तक्रारी दाखल करत मदतीसाठी सहकार्य मागितले. मुंबई महापालिकेच्या सीएसएमटी येथील मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयात फोन सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खणखणत होता.
 
सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत ‘१९१६’ या महापालिकेच्या हेल्पलाईनवर तब्बल ४ हजार ८४८ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी सा
चणे, रस्ते, घरे आदी ठिकाणी झाडे, फांद्या कोसळणे, वाहतूक बंद पडणे, अंधेरी सब-वे या ठिकाणी पाणी साचणे, काही समुद्रात बोट दुर्घटना होणे आदी विविध स्वरूपाच्या घटनांबाबत या तक्रारी आल्या. पालिकेकडे तात्काळ मदतीसाठी दाद मागितली गेली.
 
नागरिकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी प्राप्त होताच पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून तात्काळ सदर तक्रारी संबंधित विभागाकडे कळविण्यात आल्या. त्या मार्गी लावण्याचा व नागरिकांना समस्येपासून तात्काळ दिलासा देण्याचा महापालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाकड पोलिसांनी पकडले साडेसहा टन रक्तचंदन; तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड