मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे.
मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे हे सुद्धा नाराज असल्याची माहित मिळत आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः वसंत मोरे यांना बोलावणं पाठवले आहे.
राज ठाकरे यांनी स्वतः वसंत मोरे यांना बोलावल्यामुळे नेमकी काय चर्चा होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी वसंत मोरे यांना बोलावणं केलं आहे.राज ठाकरे वसंत मोरे यांची मनधरणी किंवा नाराजी दूर करण्यात यशस्वी होणार का? तसेच राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
वसंत मोरे यांच्या मतदार संघात मुस्लिम मतांची संख्या जास्त आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे वसंत मोरे याना अडचण निर्माण झाली आहे.
तसेच नगरसेवक साईनाथ बाबर हेदखील नाराज असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. मात्र साईनाथ बाबर यांनी प्रतिर्क्रिया देत नाराज नसल्यचे एकप्रकरे सांगितले असल्याचे दिसत आहे.
नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय. नाराज असण्याचा प्रश्न नाही. साईनाथ बाबर हे नाराज असल्याची माहिती अख्या शहरभर पसरली होती. त्यानंतर आज त्यांनी याबाबत खंडन केले आहे.
साईनाथ बाबर हे कोंढवा संघातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. कोंढव्यात 70 टक्के मतदान मुस्लिमांचं आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेमुळे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.