पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला. दरम्यान या महामोर्चासाठी दुपारी राज ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा जेव्हा मरीनड्राईव्हच्या दिशेने रवाना झाला तेव्हा त्या मार्गाने येणाऱ्या एका रुग्णवाहिकेच्या सायरनाचा आवाज ऐकून राज ठाकरेंचा ताफा काही क्षण थांबला व त्या रूग्णवाहिकेस जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला.
रुग्णवाहिका गेल्यानंतर राज ठाकरेंच्या वाहनाचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. यातून एकप्रकारे सामाजिक बांधिलकीचा संदेश मनेसेच्यावतीने देण्यात आल्याचे दिसून आले. या महामोर्चासाठी महाराष्ट्रभरातून मोठ्यासंख्येने कार्यकर्ते आले होते. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती.