Publish Date: Mon, 09 May 2022 (17:59 IST)
Updated Date: Fri, 14 Oct 2022 (21:37 IST)
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील भायखळ्यात राहणार्या एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीने एका लहान मुलीला चहा आणि बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. नंतर या मुलीला एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुणालाही सांगायचे नाही असे धमकी ही त्या मुलीला दिली होती.
नंतर मुलीने आपल्या आईला झाला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आईन तत्काळ पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली आणि त्याची रवानगी तुरुंगाग केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.