Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माजी आमदार सरदार तारासिंह यांचा मृत्यू वाचा सत्य काय आहे ते

माजी आमदार सरदार तारासिंह यांचा मृत्यू वाचा सत्य काय आहे ते
, गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (08:27 IST)
मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सरदार तारासिंह यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरली आहे. यावर भाजप नेते किरीट सौमय्या यांनी पूर्णविराम दिला आहे. तारासिंह यांच्यावर मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती किरीट सौमय्या यांनी ट्विटद्वारे दिली.
 
माजी आमदार सरदार तारासिंह हे आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, भाजपच्या चित्रा वाध यांनी ट्वीटर वरून तारा सिंह यांच्या निधनाची बातमी शेअर केली होती. दरम्यान, ‘मेरा काम ही मेरी पहचान”आयुष्याच्या शेवटाच्या क्षणापर्यंत या त्यांच्या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य करत राहणारे नगरसेवक ते आमदार अशी जवळजवळ ४० वर्ष राजकीय कारकीर्द गाजवणारे आमदार सरदार तारासिंह यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांना चिरशांती देवो हीच प्रार्थना’ असं त्यांनी ट्वीट केले होते.
 
सरदार तारा सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात मुंबई महानगर पालिकेतून झाली होती. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे. दरम्यान चित्रा वाघ यांच्या पाठोपाठ आमदार राम सातपुते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते नवाब मलिक यांनी देखील तारा सिंह यांच्यासाठी शोक संदेश लिहला होता.
 
सरदार तारासिंह हे महाराष्ट्राचे माजी आमदार होते. मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदार संघाचे त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व केले होते. 2018 साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेड च्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला होता. मागील वर्षी सरदार तारा सिंह यांचा मुलगा रणजित सिंह याला मुंबई पोलिसांनी पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठी बातमी, मुंबईच्या मध्यभागी ६०० एकर जागा वनासाठी राखीव