rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ईडी चौकशीला संजय राऊत गैरहजर; ७ ऑगस्टपर्यंतचा मागितला वेळ

Sanjay Raut
, गुरूवार, 21 जुलै 2022 (08:21 IST)
मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून संजय राऊत यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, राऊत सध्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आज चौकशीला हजर राहू शकले नाही. दरम्यान, या प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी राऊतांनी 7 ऑगस्टपर्यंतचा वेळ मागितला आहे. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये अटॅच केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली.
 
मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवृती वेतन धारकास मोबाईलव्दारे घरी बसूनच करता येणार जीवन प्रमाणपत्र