शिवसेना आणि भाजपचे केंदीय मंत्री नारायण राणे वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. मुंबई महापालिकेकडून नारायण राणे यांच्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यात आलं होतं. या बंगल्याचे बांधकाम सिआरझेडचे (CRZ) उल्लंघन असल्याबाबत तक्रार आरटीआय कार्यकर्ता संतोष दौंडकर यांनी तक्रार दाखल केली होती. मुंबई महापालिकेचं पथक राणे यांच्या बंगल्यावर धडकलं होतं. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे.
जुहूच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं नमूद करत मुंबई महापालिकेने ही नोटीस काढली असून सात दिवसात आपलं म्हणणं सादर करा असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे.