तसेच ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि घाबरून एक्सीलरेटर दाबला आणि 30-35 जणांना धडक दिली. दिलीप लांडे यांनी पत्रकारांना सांगितले की, “कुर्ला स्थानकातून निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. चालक घाबरला आणि त्याने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबला आणि बसचा वेग वाढला. बसवर नियंत्रण ठेवता न आल्याने 30-35 जणांना धडक दिली. लोकांचा मृत्यू झाला असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सायन हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल आणि इतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.#WATCH | Dilip Lande, Shiv Sena MLA says, " A bus which left from Kurla Station, its brake got failed and the driver lost the control of the bus. Driver got scared and instead of pressing the brake, he pressed the accelerator and the speed of the bus increased. He couldn't… https://t.co/aYuqFfk6Ks pic.twitter.com/wLu8iqXsJX
— ANI (@ANI) December 9, 2024