Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक! मुंबईत पुन्हा एक निष्पाप जीव लैंगिक अत्याचाराला बळी गेलं

धक्कादायक! मुंबईत पुन्हा एक निष्पाप जीव लैंगिक अत्याचाराला बळी गेलं
, शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (12:15 IST)
सध्या राज्यात लैंगिक अत्याचार होण्याचे प्रकरणे वाढले आहे. सध्या साकीनाकाचे प्रकरण ला काहीच दिवस झाले असताना.मुंबईत एका सहा वर्षाच्या मुलीवर सख्ख्या मामानेच अत्याचार करण्याच्या घटनेला अजून काही तासच झाले असताना मुंबई पुन्हा अशा प्रकाराच्या घटनेने हादरली आहे. मुंबईतील एका सोसायटीत सम्पूर्ण सोसायटीची सुरक्षेची काळजी घेणाऱ्या वॉचमन नेच त्या सोसायटीतील एका 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. 

मुंबईच्या कांजूरमार्ग येथे ही घटना घडली आहे.पोलिसांनी वॉचमनच्या विरोधात पॉक्सो ऍक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.या घटनेमुळे संतापाची लाट उसळत आहे.संतप्त नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .सदर आरोपीची आज न्यायालयात पेशी होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगली बातमी !आता औषधे एटीएममधून दिली जातील,प्रेग्नेंसी किट देखील उपलब्ध होईल