Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

धक्कादायक : नायलॉन दोरीमुळे दोन मित्रांनी जीव गमावला

Shocking
, शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (09:20 IST)
रस्त्यावर एखादं काम सुरू असताना तिथं बॅरिकेट्स लावले जातात. पण अनेकदा काही ठिकाणी या बॅरिकेट्सऐवजी नायलॉन दोऱ्या बांधलेल्या दिसतात. अशाच नायलॉन दोरीमुळे दोन मित्रांनी आपला जीव गमावला आहे. कल्याण पूर्वमध्ये ही घटना घडली आहे. मुकेश राय आणि योगेश सांगळे अशी मृतांची नावं आहेत.
 
कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडी परिसरात राहणारे योगेश सांगळे आणि जिम्मी बाग परिसरात राहणारा मुकेश राय हे दोघे चांगले मित्र होते.योगेश हाजगताप वाडीत राहत होता. गुरुवारी (11 फेब्रुवारी) योगेशला कामावर जायचं होतं म्हणून मुकेश राय त्याला आपल्या दुचाकीवर बसवून कल्याण रेल्वे स्टेशनला निघाला. लोकल 7 नंबर प्लेटफॉर्मवर उभी होती. 7 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर जात असताना तिथं बॅरिकेट्सऐवजी नायलॉन दोरी लावलेली होती. हीच नायलॉन दोरी मुकेशच्या गळ्यात अडकली. त्याचा गळा कापला गेला. तो खाली पडला. यानंतर त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा मित्र योगेशही गाडीच्या खाली आपटला गेला. या अपघातात दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : फडणवीसांनी पोलिस महासंचालकास ‘त्या’ ऑडिओ क्लिप पाठविल्या