एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसापासून संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. या संपाचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स घेऊन जास्त भाडं आकारून प्रवाशांना लुटत आहे. यामुळे नागरिकांमध्ये चांगलाच रोष आहे. राज्यसरकारने कर्मचाऱ्यांच्या मागणीला मान देत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.
आज मुंबईत मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांनी विराट मोर्चेच आयोजन केलं आहे. या साठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी मुंबईत दाखल होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सदाभाऊ खोत आणि गोविंद पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालया समोर मोर्चा काढणार आहे. कर्मचाऱ्यांच्या संपा विरोधात महामंडळ अवमान याचिका उच्च नायायालयात सादर करणार आहे.
राज्यसरकारने आता एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत 376 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्याने म्हणणे आहे की निलंबन झाले तरी ही हे आंदोलन आणि संप सुरु राहील. सदाभाऊ खोत आणि इतर मोर्चाकऱ्यांना मानखुर्द पोलिसांनी अडवले आहे. आपल्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.