चहाची तल्लफ आली आणि त्यांनी चहा पिण्यासाठी गाडी थांबवली आणि थेट चहाच्या हॉटेल कडे वळले आणि काही वेळा नंतर त्यानी रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या गाडीवर चक्क मोठी दरड कोसळली. ते गाडीत नसल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.ही घटना कल्याण -अहमदनगर महामार्गावर काल 11 जून रोजी घडली
.सध्या महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असल्याने माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडणे सहज आहे.माळशेज घाट परिसरात संतत पाऊसधार सुरु आहे.त्यात ही दरड कोसळण्याची घटना घडली परंतु सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
ही घटना कालची आहे अहमदनगरमध्ये वास्तव्य करणारे मुकुंद बसावे हे आपल्या मित्रासह गाडीने वडिलांना आणण्यासाठी निघाले होते.संध्याकाळी पाचच्या सुमारास माळशेज घाट आल्यावर त्यांना चहा पिण्याची तल्लफ आली त्यांनी समोर असलेल्या चहाच्या दुकानात गाडी कडेला लावून चहा पिण्यासाठी उतरले आणि हॉटेलात गेले असताना त्यांनी रस्त्याकडे उभी केलेल्या गाडीवर अचानक दरड येऊन कोसळली.सुदैवाने कोणीही त्या गाडीत नव्हते.म्हणून ते दोघे बचावले.
त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हणून ते वाचले.दरड कोसळल्याची माहिती मिळतातच पोलीस प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरड हटविण्याचे काम युद्धस्तरीय पातळीवर करून दरड हटविली.चहामुळे त्या दोघांचे प्राण वाचल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.