Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने सहायक पोलिस निरीक्षकाचा गळा चिरला

पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने सहायक पोलिस निरीक्षकाचा गळा चिरला
, मंगळवार, 19 जानेवारी 2021 (16:10 IST)
मुंबईत पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने सहायक पोलिस निरीक्षकाचा गळा चिरला आहे. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने पोलिस अधिकाऱ्याचे प्राण वाचले. पोलिस अधिकारी दुचाकीवरून जात असताना ही धक्कादायक घटना घडली.
 
वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर आले असतानाच अचानक नायलॉनचा मांजा गळ्याजववळ आला, पण दुचाकीवर नियंत्रण मिळवताना त्यांचा गळा मांजाने चिरला आणि गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. जवळच ड्युटीवर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने तात्काळ गवळी यांना लगेचच जे. जे. रुग्णालयात नेले. नंतर या घटनेबाबत समजताच पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी गवळी यांना तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी व्होकार्ट रुग्णालयात हलविले. वेळ न गमावता त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रीय करण्यात आली. गळ्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना दहा टाके पडले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी, संजय पांडे यांचा टोला