Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सायकल चोर कॅमेऱ्यात कैद

cycle chor
, शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (12:57 IST)
खारघर परिसरात सायकल चोरीचे प्रमाण वाढले  असनू एक चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो  चालाखीने सोसायटीत शिरतो आणि शांतता असल्याचा फायदा घेवून तो सायकल चोरुन नेतो. त्याचा हा सर्व प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 
 
सायकल चोर सोसायटीत वॉचमन नसल्याचा फायदा घेऊन सोसायटीच्या आवारात प्रवेश करतो आणि काही काळ थांबून तेथील सायकल हेरतो. त्यानंतर सायकलवर बसून तेथून पळ काढतो. हा प्रकार खारघर सेक्टर 34, फॉर्च्यून स्प्रिंग या बिल्डिंगमध्ये घडला आहे. सायकल चोरी करणारा गुन्हेगार हा सराईत गुन्हेगार असून याचे नाव रामबाबू असल्याचे समोर आले आहे. राम बाबू हा सराईत गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र तो पुन्हा जेलमधून बाहेर आला आहे.
भानू प्रताप सिंग फॉर्च्यून स्प्रिंग बिल्डिंगचे सेक्रेटरी यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीच्या IGI विमानतळावर 2 उड्डाणे रद्द, 150 जणांनी मोठा गोंधळ घातला