Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चालत्या रेल्वेत चढताना पाय निसटला आणि नशीब बलवत्तर म्हणून वाचला

चालत्या रेल्वेत चढताना पाय निसटला आणि नशीब बलवत्तर म्हणून वाचला
, मंगळवार, 25 जानेवारी 2022 (15:30 IST)
'अति घाई संकटात नेई,' ही म्हण आज चरितार्थ झालीच. धावत्या ट्रेन मध्ये चढणे हे संकटात नेते. अनेकदा आपण अशा घटना ऐकल्या आहेत. या मध्ये चालत्या ट्रेन मध्ये चढतांना अनेक प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहे. तरी ही प्रवाशी धावत्या ट्रेन मध्ये चढण्याचे धाडस करतात आणि आपल्या जीव धोक्यात टाकतात. असेच काहीसे घडले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड येथील रेल्वे स्थानकात धावत्या मेल मध्ये चढणे एका प्रवाशाचा जीवावर बेतले. या प्रवाशाचे रेल्वेत चढताना पाय निसटून रेल्वे प्लॅटफॉर्मच्या खाली कोसळून पडला नशीब बलवत्तर होते म्हणून त्या प्रवाशाचे प्राण आरपीएफच्या जवानांनी वाचवले. ही संपूर्ण घटना रेल्वेच्या सीसीटीव्ही कैमरात कैद झाली आहे.   
 
ही घटना रविवारी पहाटे 4 :45 वाजेच्या दरम्यान वसई रोडच्या रेल्वे स्थानकात घडली आहे. या स्थानकात फलाट क्रमांक 3 वर राजस्थानच्या बासवाडाला जाणारी ट्रेन आल्यावर वेजा हर्दू मैदा नावाचा प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात पाय निसटून ट्रेनच्या दाराला अडकून फरफटत होता. हे दृश्य तेथे कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान रमेन्द्र कुमार यांनी पहिले. त्यांनी तातडीने ट्रेन कडे धाव घेत या प्रवासाला ट्रेनच्या खाली जाण्यापासून मागे ओढले आणि त्याचे प्राण वाचवले. या घटनेत प्रवासीला किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. अशा प्रकारे आरपीएफच्या जवान रमेन्द्र यांच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचे प्राण वाचले. आरपीएफ जवान यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस सोडल्यानंतर आरपीएन सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं, मोदी-शहांबद्दल असं म्हटलं