Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आईने मुलीला मोबाईल वरून रागावल्याने मुलीने विष प्राशन केले, मृत्यू

आईने मुलीला मोबाईल वरून रागावल्याने मुलीने विष प्राशन केले, मृत्यू
, सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (15:05 IST)
मोबाईलचे अति सेवन जीवघेणे ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे आईने मुलीला मोबाईलचा जास्त वापर केल्यापासून रोखल्यावर 15 वर्षाच्या मुलीने विष प्राशन करून आत्मह्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
 
सदर घटना 26 सप्टेंबरची आहे. मुलीला मोबाइलफोन वापरण्याची जास्त सवय असल्याने आईने मुलीला रागावले.

या वरून मुलीने उंदीर मारण्याच्या औषधाचे सेवन केले तिची प्रकृती ढासळल्यावर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराधीन असता तिचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

20 हजार रुपयांची गाडी तर 60 हजार रुपये सेलिब्रेशनमध्ये खर्च, पोलिसांनी जप्त केली !