मुंबई मध्ये मरीन ड्राइव्ह वर गुरुवारी भारतीय क्रिकेट टीमच्या विक्ट्री परेड पाहण्यासाठी लाखो लोक जमा झाले होते. एवढ्या गर्दीमुळे अचानक एका महिलेची तब्येत बिघडली. महिलेला बेशुद्ध होत असताना एका पोलीस शिपाईने पाहिले व या पोलीस शिपाईने देवदूत बनून तिचे प्राण वाचवले.
टी-20 वल्डकप जिंकल्यानंतर मुंबईमध्ये टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईच्या मरीन ड्राइव्हर लाखो लोक जमा झाले होते. पण या गर्दीमुळे अचानक एका महिलेची तब्येत बिघडली व तिला भूरळ आली. या महिलेला बेशुद्ध होतांना पोलीस शिरपाई सईद सलीम पिंजारी यांनी पाहिले. तसेच यांनी त्या महिलेला खांद्यावर टाकून गर्दीतून बाहेर काढत थेट रुग्णालयात नेले. यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले आहे.
या पोलीस शिपाईच्या शौर्याचे सर्वीकडे कौतुक केले जात आहे.