मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल शनिवारी रात्री विमानतळावर आला असून रात्री मुंबईहून अहमदाबाद जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली.ईमेल मिळतातच विमान प्राधिकरणाकडून विमानाची तपासणी घेण्यात आली असून त्यात काहीही आढळले नाही. धमकीच्या मेलच्या पार्श्ववभूमीवर सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आली आहे. पोलीस हा मेल कुठून आला कोणी पाठवला याचा तपास करत आहे. पोलिसांनी नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले आहे.
शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर धमकीचा मेल आला त्यात विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याचे सांगितले होते. तसेच इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे देखील लिहिले होते. विमानाची तपासणी केल्यावर त्यात काहीही आढळले नाही. विमानतळावर सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आले आहे. पोलीस तपास करत आहे.